News-Details

शिव जयंती

Place: यवतमाळ | Date: 2026-02-19


अमोलकचंद महाविद्यालय परिवारातर्फे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रम नैसर्गिक वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात पार पडला. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन वानखेडे यांनी समर्थपणे पार पाडली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर व त्यांच्या आदर्शांवर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरोज कुंभारे यांनी केले.