News-Details

महाविद्यालयातील खेळाडूंना वुशू मध्ये सुवर्णपदक व रजतपदक

Place: यवतमाळ | Date: 2026-09-21


क्रीडा व सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, वुशू असोसिएशन ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा (२०२६- २७) १९ वर्षाखालील मुलें मध्ये ( ९० किलो खालील) वजन गटामध्ये अमोलकचंद महाविद्यालयातील खेळाडू आदर्श प्रदीप जाधव यांनी प्रथम क्रमांक सुवर्णपदक प्राप्त केले.संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धेत अमरावती विभागाचे नेतृत्व करणार. तसेच कु. रिधिमा
देशमुख हिने यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना ( ६५ किलो खालील) वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल दोन्ही खेळाडूंची यशाबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा अध्यक्ष डॉ. विजय दर्डा व सचिव सी. ए. मा. प्रकाश चोपडा व कार्यकारिणी सर्व पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.तसेच या खेळाडूंचे अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. किशोर तायडे व क्रीडा शिक्षक प्रा संजय पंदिरवाड उपस्थित होते. त्यांच्या यशाबद्दल सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.