Place: यवतमाळ | Date: 2026-10-31

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी मुले डी झोन स्पर्धेत येथील अमोलकचंद महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. बाभूळगाव येथील शिवशक्ती महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा घेण्यात आल्या. अंतिम सामन्यात अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ आणि इंदिरा महाविद्यालय, राळेगाव या दोन संघात चुरशीची लढत झाली. अटीतटीच्या सामन्यात अमोलकचंद महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत इंदिरा महाविद्यालयाच्या संघाचा चार गुणांनी पराभव करत डी झोन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.विजेत्याअमोलकचंद महाविद्यालयाच्या संघात अमित पेंडोर, तुषार सोयाम, रोशन मडावी, लोकेश टेकाम, कार्तिक मडावी, अतुल कुंबरे, यश जुमनाके, समीर टेकाम, रूपेश कुरुपते, निकेश पवार, आदित्य ब्राह्मणे, शिवम जुनघरे या खेळाडूंचा समावेश होता. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा, सचिव सी.ए. प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी विजेत्या संघासह शारीरिक शिक्षण संचालक प्रा. किशोर तायडे, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड, आदींचे कौतुक केले.