Place: यवतमाळ | Date: 2026-09-21

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निवड चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्यांमधील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू यांच्या हस्ते झाले, विद्यार्थ्यांच्याविकासासाठी अशा प्रकारचे शिबिर अत्यंत आवश्यक असतात, विद्यार्थी येथूनच घडत असतो असे आपल्या संबोधनातून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. निलिमा दवणे यांनी कार्यक्रमाचेआयोजन व प्रास्ताविक केले. तसेच क्षेत्रीय समन्वयक प्रा. सचिन वानखेडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व तसेच राज्यस्तरीय गणतंत्र पथ संचलन, अहवान 2026 , राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहसी शिबिर राष्ट्रीय एकात्मता शिबिर, राष्ट्रीय युवा उत्सव, उत्कर्ष प्रेरणा शिबिर साठी विविध चाचण्या घेण्यात आल्या. सांस्कृतिककार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ. मनोज जोशी आणि डॉ. चंद्रशेखर कुडमेते यांनी काम पाहिले, तर शारीरिक चाचण्यांचे परीक्षण डॉ. शुभम कदम आणि प्रा. चेतन देवरे यांनी केले. तरकार्यक्रमाचे संचालन डॉ रुपेश मुद्देलवारयांनी केले व आभार प्रा. शशिकांत राठोड यांनी मानले. या शिबिरात यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.