News-Details

अमोलकचंद महाविद्यालयाच्या लोकेश टेकामची विद्यापीठ कबड्डी संघात निवड

Place: यवतमाळ | Date: 2026-11-01


 सुपर
यवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयाचा बी. ए. भाग एकचा विद्यार्थी लोकेश टेकाम याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. विद्यापीठाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचे आयोजन डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश) येथे दिनांक १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघाचे सराव प्रशिक्षण शिबिर दिनांक १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लोकेश टेकाम सहभागी होणार असून, तो पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. लोकेशच्या या निवडीबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. विजय बाबू दर्डा, सचिव सी. ए. प्रकाशजी चोपडा, संचालक मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.