News-Details

अमोलकचंद महाविद्यालयाचा अन्नदान उपक्रम

Place: यवतमाळ | Date: 2026-10-30


यवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने 'जागतिक अन्न दिन', सामाजिक जाणिवांची पेरणी करत साजरा करण्यात आला. 'एक कर्तव्य अन्नदान', उपक्रमांतर्गत वाघाडी येथील 'आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी' या शैक्षणिक आश्रयालयातील मुलींना अन्नधान्य सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे आश्रयालयातील मुलींची अन्नाची गरज तर भागलीच, तर भागलीच, परंतु विद्यार्थ्यांमध्येही समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती खंबीरपणे उभे राहण्याची भावना निर्माण झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. लाड होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या 'आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी' संस्थेच्या अध्यक्ष पपिता माळवे उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. माधुरी भादे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रूपाली कैकाडे यांनी केले. आयोजन समिती सदस्य डॉ. अनघा अनमोड, डॉ. संदीप पडवाल, डॉ. मंजुश्री महालकर, आचल उघाडे आदींनी पुढाकार घेतला. कर्मचारी गजानन पवार, हर्षवर्धन तलवारे यांचे सहकार्य लाभले.