Place: यवतमाळ | Date: 2026-09-18

शालेय सॉफ्टबॉल खेळाडूंना सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देत अमोलकचंद महाविद्यालयाने सामाजिक दायित्वाची जाणीव जपली. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय खेळाडूंना महाविद्यालयाचे सॉफ्टबॉल मैदान सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सॉफ्टबॉल कॅचर किटसह आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. तसेच महाविद्यालयातील सॉफ्टबॉल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड यांच्या हस्ते खेळाडूंना साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत आगामी स्पर्धांसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. मेहनत, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश देत त्यांनी खेळाडूंना करण्याचा संदेश देत त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. किशोर तायडे, संजय पंदिरवाड खेळाडूंचे सहकार्य लाभले. साहित्य स्वीकारताना खेळाडूंचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू भाकित मेश्राम, पियुष चांदेकर व पंकज शिरोडकर यांनी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, सचिव सीए प्रकाश चोपडा आणि अमोलकचंद महाविद्यालय परिवाराचे आभार मानले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे शालेय खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा मिळून त्यांच्या क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.