News-Details

अमोलकचंद महाविद्यालय, सायन्स क्लबच्या माध्यमातून स्कूल कनेक्ट नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार

Place: यवतमाळ | Date: 2026-09-26


अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक सभागृहात विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. विजय दर्डा यांच्या शिक्षण प्रणाली संकल्पनेतून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे सायन्स क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख श पाहुणे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी, जे. डी. आय. ई. टी., यवतमाळ यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनाच्या भाषणात डॉ. तत्ववादी यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शी दृष्टिकोन, कुतूहल आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले, जेणेकरून ते धी वास्तविक जगातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधू शकतील. त्यांनी सायन्स क्लब स्थापन करण्याच्या प्राचार्य डॉ. अजय लाड यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले आणि सांगितले की, अशा व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास आणि सामाजिक प्रगतीत योगदान देण्यास बळ मिळेल. अध्यक्षीय भाषणात अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी विज्ञान क्लबच्या माध्यमातून यवतमाळ शहरातील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, अँग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ पब्लिक स्कूल, वीणा देवी इंटरनॅशनल स्कूल, अणे विद्यालय, विवेकानंद विद्यालय इत्यादी शाळेच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मार्फत विज्ञान विषयाचे ज्ञान देणे, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोग शाळेला भेटी देण्याबाबत व इतर उपक्रमाबाबत नियोजनबद्ध आराखडा मांडला त्यासोबतच विज्ञान विषयाची तंत्रज्ञानासोबत सांगड घालण्यासाठी जेडीआयईटी महाविद्यालयाची मदत घेईल हा सायन्स क्लब प्रदर्शने, स्पर्धा, तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील सर्जनशीलता, सांघिक कार्य आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी एक चैतन्यशील व्यासपीठ ठरेल.त्यांनी स्कूल कनेक्ट या उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल, ज्यामुळे तळागाळापर्यंत वैज्ञानिक जागरूकता पसरण्यास आणि संस्थेची सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यास मदत होईल. या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व रोजगार प्राप्तीसाठी प्रिइंक्यूबॅशन सेंटर स्थापनेची घोषणा केली व त्याचे A
समन्वयक डॉ. अश्विन अतुलवार यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद काकडे यांनी विज्ञान क्लबची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट केली.कार्यक्रमास अँग्लो हिंदी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी श्री. एस. एस. राठोड आणि बापूजी अणे विद्यालयाचे प्रतिनिधी श्री. अमित राजकुंटवार यांची विशेष उपस्थिती लाभली. स्कूल कनेक्ट उपक्रमातील शिक्षकांचा सहभाग हा महाविद्यालय आणि शाळा यांच्यातील दृढ सहकार्याचे प्रतीक ठरला. या कार्यक्रमास विज्ञान विभाग सत्र प्रमुख डॉ. प्रवीण जोशी, आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. माधुरी भादे, विज्ञान शाखेतील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बी.एस्सी. व एम.एस्सी. चे विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे प्रा. यशवंत खंदारे सूत्रसंचालन व प्रा. डॉ. अनघा अनमोडयांनी आभार प्रदर्शन केले.