News-Details

अमोलकचंदच्या हॉकीपटू विद्यापीठ संघात

Place: यवतमाळ | Date: 2026-11-01


येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मुलींच्या हॉकी संघात निवड झाली आहे. यामध्ये जान्हवी राऊत, सुहानी चाणेकर आणि गायत्री पुरी यांचा समावेश आहे. त्यांना सलग दुसऱ्यांदा विद्यापीठ हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.राजस्थानातील जयपूर येथे २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा होणार आहे. अमोलकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर विद्यापीठ संघात स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा, सचिव चार्टर्ड अकाऊंटंट प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. अजय लाड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड, प्रशिक्षक मनीषा आकरे आदींनी कौतुक केले.